श्रुती पाटील

पुणे (ता.१९) – पुणे शहरात भारतीय जनता पक्षाकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

याकरिता आमदार रवींद्र धंदेकर यांच्या सह काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी काँग्रेस नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

भाजप नेत्यांवर कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या पक्षाचे चिन्ह पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार असा इशारा यावेळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला.