२७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने रामदेव बाबा यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींवर बंदी घातली होती तसेच पतंजली आयुर्वेद कंपनी आणि बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टने नोटीस बजावली. पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वामी रामदेव (पतंजलीचे सह-संस्थापक) आणि पतंजलीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. कंपनी आणि आचार्य बाळकृष्ण यांना आधीच बजावलेल्या नोटीसचे उत्तर न दिल्याने न्यायालयाने आज म्हणजेच मंगळवारी हा आदेश दिला आहे.