पुणे (ता. १९): वंदे मातरम् संघटनेकडून ‘व्यर्थ न हो बलिदान’ देशभक्तीपर पुरस्कार २०२४ चे आयोजन केले आहे. शहीद दिन रोजी म्हणजेच २३ मार्च रोजी वंदे मातरम् संघटना आणि युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असलेल्या व्यक्तिमत्त्वांना पुरस्कृत केले जाणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ सामाजिक समाजसेविका मा. वेरूळताई गावस्कर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सूर्यकांत पाठक यांना ज्येष्ठ सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेकलाक्षेत्रात आपल्या कलाकारीचा ठसा उमटवणारे सचिन खेडेकर यांना कलाक्षेत्रासाठी तर लिखाणासाठी साहित्य क्षेत्राचा पुरस्कार, युवा लेखक शरद तांदळे यांना देण्यात येणार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ लेखक संपादक श्रीराम पवार यांना जेष्ठ पत्रकारिता पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील कार्यासाठी, छत्रपती पुरस्कार विजेते ‘अनिल मुंडे’ यांना तर सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांना सामाजिक क्षेत्रासाठी तसेच उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कर्तृत्वासाठी राहुल पापर यांना सन्मानित केले जात आहे.


या कार्यक्रमासाठी निवृत्त एअर फोर्स अधिकारी एअरमार्शल भूषण गोखले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील तसेच साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे हे कार्यक्रमाचे अतिथी म्हणून लाभणार आहे


शनिवारी दिनांक २३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८.३० वेळेत उद्यान प्रसाद मंगल कार्यालय खजिना विहीर स्काऊट ग्राउंड पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असे वंदे मातरम संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे, अध्यक्ष वैभव वाघ अध्यक्ष महेश बाटले यांनी पत्रकार परिषदेत यांनी सांगितले.