भारतात खूप नयनरम्य ठिकाणे आहेत. कुठे फिरायला जायचे म्हटले कि आपल्याला एखादे थंड हवेचे ठिकाण, शिखरे किंवा शांत समुद्रकिनारा असे नजारे डोळ्यासमोर येतात. पण तुम्ही कधी कुठल्या गावात किंवा लहानशा खेड्यात फिरायला गेला आहात का? चला तर मग जाणून घेऊया भारतातील अशा काही गावांबद्दल.


मलाणा, हिमाचल प्रदेश
मलाणा हे गाव हिमाचल प्रदेशामध्ये असलेले छोटेसे गाव आहे. हे गाव कुल्लू च्या उत्तर-पूर्व भागात स्थित आहे. येथील सुंदरता आणि हिमालयाची शिखरे तुमच्या मनाला सुखद अनुभूती देतात. इथे फिरण्याचे अनेक फायद्यापैंकी एक म्हणजेच इथे तुम्हाला नवीन नवीन गोष्टींबद्दल माहिती मिळते.
स्मित गाव, मेघालय
मेघालय ची राजधानी शिलॉन्ग पासून अवघ्या ११ किमी वर वसलेले आहे हे स्मित गाव. हे गाव पर्वतांच्या मधोमध वसलेले आहे. या गावाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे गाव पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे. त्याचबरोबर या गावाची आशियातील सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गावांमध्ये गणना केली जाते. येथी स्थानिक लोक मुख्यतः मसाल्यांची शेती करतात. तुम्ही या आशियातील सर्वर सुंदर, शांत आणि स्वच्छ गावाला एकदा भेट दिलीच पाहिजे.
मावलिगॉन्ग, मेघालय
हे गाव शिलॉन्गपासून जवळजवळ ९० किमीवर स्थित आहे. हे गाव खूपच स्वच्छ आणि चारी बाजुंनी हिरवळीने वेढलेले आहे. या गावाची खासियत म्हणजे येथे तुम्हाला नैसर्गिकरित्या तयार झालेले रूट ब्रिज बघायला मिळतील. तुम्हीही तुमच्या परिवारासोबत इथे फिरायला जाऊ शकता.
खोनोमा गाव
हे गाव कोहिमा शहरापासून जवळच २० किमी अंतरावर वसलेले आहे. इथे विविध प्रकारचे जीवजंतू बघायला मिळतात. तसेच इथे झाडांच्या विविध प्रजाती देखील आहेत.
दिस्कित गाव, लडाख
हे गाव लडाखच्या लेह जिल्ह्यात आहे. येथील शांत वातावरण आहे. खूप कमी लोकांना या गावाचा परिचय आहे. इथे तुम्ही असीम शांततेचा अनुभव घेऊ शकता. जास्त करून लोक इथे अध्ययन किंवा ध्यान धारणेसाठी येतात.

Vrutta Vidya Correspondent